नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता कधी येणार? सविस्तर माहिती
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता कधी येणार? सविस्तर माहिती
Read More
उन्हाळी तीळ लागवड ; कमी दिवसात मिळेल भरघोस उत्पादन..मालामाल पिक
उन्हाळी तीळ लागवड ; कमी दिवसात मिळेल भरघोस उत्पादन..मालामाल पिक
Read More
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नवा जीआर : या महिलांना मोठी खुशखबर
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नवा जीआर : या महिलांना मोठी खुशखबर
Read More
खरीप पीकविम्याचा परतावा जानेवारीपासून मिळणार
खरीप पीकविम्याचा परतावा जानेवारीपासून मिळणार
Read More
बांधकाम कामगार भांडी संच योजना ; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
बांधकाम कामगार भांडी संच योजना ; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
Read More

अतीव्रुष्टी नुकसान भरपाई, उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच मिळनार – सर्व जिल्ह्याची अपडेट

खरीप हंगाम २०२५ मध्ये राज्यातील विविध भागांमध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतीपिके, फळबागा आणि पशुधनाचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीसाठी राज्य शासनाने मदत वाटपासाठी मंजुरी दिली असून, विविध जिल्ह्यांसाठी भरपाईचे प्रस्ताव दाखल करण्यात आलेले आहेत. तसेच, रब्बी अनुदानाचे वितरण करण्यासाठीही मान्यता देण्यात आलेली होती. सुरुवातीला या अनुदानाच्या वाटपात प्रशासकीय स्तरावर काही अडचणी आल्या, ज्यात वारंवार वितरण थांबणे आणि ‘केवायसी’ (KYC) प्रक्रिया सुरू होणे यांचा समावेश होता. आता पुन्हा एकदा केवायसी करण्याची मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवण्यात आली असून, उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टीची रक्कम लवकरच जमा होण्याची शक्यता आहे. राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू होत असताना, येत्या दिवसांपासून पुन्हा एकदा अनुदानाचे वितरण सुरू होण्याची अपेक्षा आहे.

ADS किंमत पहा ×

राज्यातील अतिवृष्टी आणि रब्बी अनुदानासाठी एकूण १९,४६४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. यापैकी १३,७७८ कोटी रुपयांचे वाटप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये करण्यात आले आहे. सुमारे ५,६८६ कोटी रुपयांचे अनुदान वाटप अद्याप बाकी आहे, जे एकूण मंजूर रकमेच्या ४० ते ४५ टक्के आहे. प्रामुख्याने केवायसी पूर्ण न झालेले शेतकरी, सामायिक खातेधारक, मयत खातेधारक आणि फळबागधारक शेतकरी यांच्याशी संबंधित रक्कम वितरणाधीन आहे. ही प्रलंबित रक्कम लवकरच संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल, अशी अपेक्षा आहे.

Leave a Comment