धाराशिव जिल्ह्यातील (उस्मानाबाद) शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे. खरीप हंगाम २०२० मध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता, अशा पात्र शेतकऱ्यांच्या याद्या आता प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. ही यादी जिल्ह्यातील प्रत्येक गावापर्यंत पोहोचत आहे.
ADSकिंमत पहा×
खरीप हंगाम २०२० चा पीक विमा मंजूर झाला असून, या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांमध्ये सुमारे २२० कोटी रुपयांचे वाटप करणार आहे. पीक विमा वाटपाच्या प्रक्रियेतील पहिली पायरी म्हणून, या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या याद्यांमध्ये शेतकऱ्याचे नाव, त्याने कोणत्या पिकावर विमा भरला होता आणि किती क्षेत्र दाखवले आहे, या सर्व तपशिलांचा समावेश आहे.
याद्या तपासण्याची प्रक्रिया आणि तालुक्यांची स्थिती
धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये (तुळजापूर, भूम, लोहारा, उमरगा, वाशी, धाराशिव) याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. या याद्या पीडीएफ स्वरूपात सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहेत. शेतकऱ्यांनी पुढील गोष्टी तपासणे आवश्यक आहे:
ADSकिंमत पहा×
या यादीमध्ये आपले नाव आहे का?
ADSकिंमत पहा×
दाखवलेले क्षेत्र किती आहे?
सध्या याद्या प्रसिद्ध होत असल्याने, पीक विमा वाटपाच्या हालचालींना वेग आला आहे. लवकरच पीक विमा वाटप सुरू होऊ शकते.
क्षेत्र कमी दाखवण्याचे कारण आणि शेतकऱ्यांचा गोंधळ
या याद्या पाहिल्यानंतर काही शेतकरी गोंधळले आहेत, कारण त्यांना त्यांच्या नावावर दाखवलेले क्षेत्र कमी दिसत आहे. याचे कारण असे आहे की, खरीप हंगाम २०२० मध्ये शेतकऱ्यांनी फक्त सोयाबीन पिकावर जितक्या क्षेत्रासाठी पीक विमा भरला होता, तेवढेच क्षेत्र या यादीत दाखवले जात आहे.
उदाहरणार्थ: जर तुमच्याकडे ५ एकर जमीन असेल आणि तुम्ही त्यातील २ एकरवर उडीद व ३ एकरवर सोयाबीन लावले असेल, तर उडदाचे क्षेत्र वगळण्यात आले आहे. फक्त सोयाबीनवर जितका पीक विमा भरला होता, तेवढ्याच क्षेत्राचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. त्यामुळे, शेतकऱ्यांचे एकूण क्षेत्र कमी केलेले नाही, तर फक्त विमा भरलेल्या पिकाचे क्षेत्र दाखवले आहे.
पीक विमा कोणाला मिळणार?
खरीप हंगाम २०२० मध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता, परंतु त्यांना कोणत्याही कारणास्तव विमा मिळाला नव्हता, अशाच शेतकऱ्यांची नावे या यादीत आहेत.
ज्या शेतकऱ्यांनी २०२० मध्ये क्लेम केला होता आणि त्यांना काही रक्कम मिळाली होती, अशा काही शेतकऱ्यांची नावे या याद्यांमध्ये दिसत नाहीत.
मात्र, या शेतकऱ्यांनी तूर्तास काळजी करू नये. फक्त ज्यांनी पीक विमा काढला होता आणि त्यांना पैसे मिळाले नव्हते, त्यांची नावे यादीत आहेत.
सध्या उमरगा आणि लोहारा तालुक्यात अतिवृष्टीचे अनुदान (बजेट अभावी) काही शेतकऱ्यांचे आलेले नाही. मात्र, त्यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्नशील असून, त्याबाबतही लवकरच अपडेट येईल. सध्या तरी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी याद्या तपासाव्यात.