महसूल विभागाचा मोठा निर्णय ; आता सातबारावर तलाठ्यांच्या सहीची गरज नाही
महसूल विभागाचा मोठा निर्णय ; आता सातबारावर तलाठ्यांच्या सहीची गरज नाही
Read More
Onion rate ; कांदा भावात सुधारणा, पहा आजचे ताजे कांदा भाव
Onion rate ; कांदा भावात सुधारणा, पहा आजचे ताजे कांदा भाव
Read More
सोयाबीन भाव मोठी वाढ; पहा आजचे ताजे सोयाबीन भाव
सोयाबीन भाव मोठी वाढ; पहा आजचे ताजे सोयाबीन भाव
Read More
राज्यात पुन्हा पाऊस ? पहा पंजाब डख यांचा अंदाज
राज्यात पुन्हा पाऊस ? पहा पंजाब डख यांचा अंदाज
Read More
मोठी बातमी: राज्यातील शेतकऱ्यांना ३० जूनपूर्वी संपूर्ण कर्जमाफी! रकमेची मर्यादा नाही, सातबारा होणार कोरा
मोठी बातमी: राज्यातील शेतकऱ्यांना ३० जूनपूर्वी संपूर्ण कर्जमाफी! रकमेची मर्यादा नाही, सातबारा होणार कोरा
Read More

गजानन जाधव यांचे उशिरा गहू पेरणीचे सुधारित तंत्रज्ञान..पहा सविस्तर

गजानन जाधव यांचे उशिरा गहू पेरणीचे सुधारित तंत्रज्ञान..पहा सविस्तर ; गव्हाच्या पेरणीची योग्य वेळ साधारणतः ३० नोव्हेंबरपर्यंत असते, असे असले तरी यावर्षी लांबलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची पेरणी वेळेवर झालेली नाही. या परिस्थितीत, ज्यांना अजून गहू पेरणी करायची आहे, त्यांच्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत उशिरा पेरणी करण्याची शिफारस केली जाते. मात्र, शेतकरी बांधवांनी हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, पेरणीस जेवढा उशीर होईल, तेवढे उत्पादनात घट येते. गजानन जाधव यांच्या माहितीनुसार, ३० नोव्हेंबरनंतर पेरणीच्या प्रत्येक पंधरवड्यात उत्पादनामध्ये प्रति एकर अडीच क्विंटलने घट होण्याची शक्यता असते. त्यामुळे १५ डिसेंबरनंतर गव्हाऐवजी दुसरे पर्यायी पीक निवडणे अधिक फायदेशीर ठरू शकते.

ADS किंमत पहा ×

उशिरा पेरणी करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. पेरणीसाठी जमिनीत पुरेशी ओल असावी आणि पेरणी शक्यतो उत्तर-दक्षिण करावी, जेणेकरून पिकाला जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळेल. उशिरा पेरणीसाठी दोन ओळींमधील अंतर कमी करून बियाण्याचे प्रमाण (सीड रेट) वाढवावे लागते. तसेच, पेरणी ५ ते ६ सेंटीमीटर खोलीवर करावी, जेणेकरून उगवण चांगली होईल. गव्हासाठी पाण्याचे योग्य नियोजन महत्त्वाचे आहे; सर्वसाधारणपणे दर १८ ते २१ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

Leave a Comment