बंगालच्या उपसागरात नवीन प्रणाली, पावसाची शक्यता आहे का? ; मच्छिंद्र बांगर यांच्या अंदाजानुसार, मैदानी भागाकडे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमार्गे पश्चिमी विक्षोभ (Western Disturbances – WD) सरकत आहेत. यामुळे राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरण वाढू शकते. सध्या एक WD पुढे सरकला आहे, तर आणखी दोन WD तयार होत आहेत. या ढगाळ परिस्थितीमुळे, जर पावसाचे वातावरण तयार झाले, तर काही ठिकाणी गारपिटीसह पाऊस पडण्याची प्राथमिक शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, सध्या थंडीच्या प्रमाणात चढ-उतार होत असून प्रभावी पश्चिमी विक्षोभ नसल्यामुळे लगेचच मोठा पाऊस किंवा गारपीट होण्याची शक्यता कमी आहे.
मध्य भारतावर थंडीची लाट मोठ्या प्रमाणात सक्रिय होण्याची शक्यता असून, याचा परिणाम विदर्भ, पश्चिम मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्लीचा काही भाग, पूर्व राजस्थान आणि झारखंडपर्यंत पोहोचला आहे. याच दरम्यान, दक्षिण भारतात बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या प्रणाली (System) तयार होण्याची शक्यता आहे. 13 ते 20 डिसेंबर दरम्यान अंदमान निकोबार ते तामिळनाडूपर्यंत एखादी सिस्टम सक्रिय राहू शकते.




















